RoadWheel Rane च्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण आहोत भोरमधील ऐतिहासिक किल्ले रोहिडा म्हणजेच विचित्रगडावर! (PART 2)
पहिल्या भागात आपण किल्ल्याची प्राथमिक चढाई पाहिली. आजच्या या दुसऱ्या भागात आपण रोहिडा किल्ल्याचे दुर्गवैभव अतिशय जवळून अनुभवणार आहोत. या व्हिडिओमध्ये आपण किल्ल्याचा तिसरा महादरवाजा आणि त्याची वैशिष्ट्ये पाहणार आहोत. या व्हिडिओचे मुख्य आकर्षण: तिसरा महादरवाजा: दरवाजाची बांधणी, त्यावरील कोरीवकाम आणि शिलालेख. महत्त्वाचे बुरुज: सर्जा बुरुज, वाघजाई बुरुज , पाटणे बुरुजाची यांची माहिती. गुप्त मार्ग: गडाचा चोर दरवाजा आणि त्याची रचना. विशेष माहिती: किल्ल्यावरील बुरुजांना आणि दरवाजांना नावे नेमकी कशी दिली जातात? यामागचे शास्त्र आणि इतिहास आपण सविस्तर समजून घेणार आहोत.
Comments
Post a Comment